आजकालची व्यस्त जीवनशैली, धावपळीचे जीवन, अपुरी झोप आणि अनियमित खाणं-पिणं यामुळे अनेकजण वजन वाढल्याबद्दल तक्रार करतात.

Mar 10,2024


वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक वर्कआऊट, व्यायाम, योगा अशा अनेक गोष्टी करण्यावर भर देतात. पण व्यायामाबरोबरच तुम्हाला चालूनही वजन कमी करता येते.


वजन कमी करण्यासाठी किती वेळ आणि किती अंतर चालणे गरजेचे आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.


जर तुम्ही दिवसातून 30 मिनिटे वेगाने चालत असाल तर ते 150 पेक्षा जास्त कॅलरीज बर्न करू शकतात.


तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि ते लवकर कमी करायचे असेल तर तुम्हाला दररोज सुमारे 10 हजार पावले चालणे आवश्यक आहे.


यासाठी तुम्ही 2000 पावलांपासून सुरुवात करा आणि नंतर हळूहळू पावले वाढवा.


केवळ चालण्याने वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावरही नियंत्रण ठेवावे लागेल.


आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करावा लागतो. त्याचबरोबर आहाराचे प्रमाणही कमी करावे लागते.


याशिवाय पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवन हेही वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

VIEW ALL

Read Next Story