आपण अनेकदा पाण्यानं टूथब्रश स्वच्छ करतो; पण पाण्यानं तो साफ होत नाही. तोंडातून घाण, लाळ इत्यादी त्यात अडकून राहते.
अशा परिस्थितीत आपला टूथब्रश सुमारे तीन महिन्यांनी एकदा बदलला पाहिजे.
जर तुमच्या ब्रशचे ब्रिशल खराब झाले असतील, तुटत असतील किंवा पूर्णपणे वाकले असतील तर तुम्ही वेळीच ब्रश बदलण्याची गरज आहे.
वास्तविक दोन ते तीन महिन्यांनंतर तुमच्या टूथब्रशचे ब्रिस्टल्स कमकुवत होतात आणि त्यामध्ये जीवाणू वाढू लागतात.
मग अशा ब्रशनं दात घासल्यानं दात स्वच्छ होण्याऐवजी खराब होऊ लागतात.
दुसरीकडे, जर ब्रशच्या ब्रिस्टल्सच्या खालच्या भागात पांढरा थर तयार होऊ लागला तर याचा अर्थ असा होतो की, ते बदलण्याची वेळ आली आहे.