किती वेळा कपडे घातल्यानंतर ते धुवावेत? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

Published by: Zee Team | May 02, 2025

तुम्ही अशा लोकांपैकी आहात का जे एकदा घातलेले कपडे लगेचच वॉशिंग मशीनमध्ये धुता.

Published by: Zee Team | May 02, 2025

की तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे तेच कपडे अनेक वेळा घातल्यानंतर धुता?

Published by: Zee Team | May 02, 2025

खरंतर या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. जास्त कपडे धुवून तुम्ही केवळ पर्यावरणावरचा भार वाढवत नाही तर तुमच्या कपड्यांचं नुकसानही करत आहात.

Published by: Zee Team | May 02, 2025

आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्ही कोणते कपडे आणि कोणत्या फॅब्रिकचे कपडे घालत आहात.

Published by: Zee Team | May 02, 2025

अमेरिकन आरोग्य संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, पॉलिस्टरसारख्या कृत्रिम कापडांवर बॅक्टेरिया जास्त काळ टिकू शकतात.

Published by: Zee Team | May 02, 2025

तर कापूस आणि मिश्रित तंतूसारख्या नैसर्गिक कापडांवर बॅक्टेरिया कमी काळ टिकतात.

Published by: Zee Team | May 02, 2025

पॉलिस्टरवर बॅक्टेरिया 90 दिवसांपर्यंत जगू शकतात. तर कापसावर ते 30 दिवसांपर्यंत जगू शकतात.

Published by: Zee Team | May 02, 2025

अमेरिकेच्या युटा स्टेट युनिव्हर्सिटीने त्यांच्या वेबसाइटवर अमेरिकन क्लिनिंग इन्स्टिट्यूटचानुसार सिल्क आणि लेसचे कपडे एकदा घातल्यानंतर धुवावेत.

Published by: Zee Team | May 02, 2025

टी शर्ट, वर्कआउट वेअर, टँक टॉप, अंडरवेअर हे देखील घालल्यानंतर प्रत्येक वेळी धुवावेत कारण त्यात बॅक्टेरिया जमा होण्याची आणि घामाची शक्यता जास्त असते.

Published by: Zee Team | May 02, 2025

स्वेटशर्ट आणि स्वेटर सारख्या गोष्टी 3 ते 4 वेळा घातल्यानंतर धुवाव्यात.

Published by: Zee Team | May 02, 2025

संध्याकाळचे गाऊन 3 ते 4 वेळा घातल्यानंतर धुवा. उन्हाळ्याचे कॅज्युअल कपडे आणि त्वचेला जास्त स्पर्श करणारे घट्ट कपडे 1-2 वेळा घातल्यानंतर धुवावेत.

Published by: Zee Team | May 02, 2025

VIEW ALL

Read Next Story