अंड हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतं. अनेकदा फिटनेस फ्रिक लोकं अंड्याचा रोजच्या आहारात समावेश करतात.
पण अनेकदा अंडी उकडताना ती फुटतात. तेव्हा असं होऊ नये यासाठी काय करावं याविषयी जाणून घेऊयात.
अंडी उकडण्यासाठी आधी एका भांड्यात पाणी घेऊन मग त्यात अंडी सोडा. मग त्यात एक ते दोन चमचे व्हाईट व्हिनेगर टाका.
तज्ज्ञांच्या मते असं केल्याने अंडी उकडताना त्यावर क्रॅक जरी आला तरीही अंड्याचा पांढरा किंवा पिवळा भाग बाहेर येणार नाही.
व्हाईट व्हिनेगर नसेल तर पाण्यात एक किंवा अर्धा चमचा मीठ सुद्धा घालू शकता. यामुळे सुद्धा अंड्याचं पांढरा किंवा पिवळा भाग बाहेर येणार नाही.
तज्ज्ञांच्या मते फ्रीजमधील थंड अंडी थेट उकळत्या पाण्यात टाकू नका. त्यामुळे अंड्याचे कवच लगेचच फुटते.
फ्रीजमधून काढलेली अंडी काही वेळ रूम टेम्परेचरला ठेवा आणि मगच पाण्यात उकळा.
अंडं उकडताना गॅसची फ्लेम ही मीडियम करावी. हाय फ्लेमवर अंडी उकळणं टाळावं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)