लॅपटॉप चालवत असताना अनेकदा तो गरम होतो आणि याचा परिणाम परफॉर्मन्सवर होतो.
अनेकदा लॅपटॉप मांडीवर किंवा बिछान्यावर ठेवल्याने लॅपटॉपचे वेंटर्स ब्लॉक होतात. ज्यामुळे हिट बाहेर निघत नाही.
म्हणून लॅपटॉपला नेहमी एका थंड ठिकाणी किंवा प्लेन जागी ठेऊन वापरा.
जर तुमचा लॅपटॉप हा खूप जुना असेल तर त्याचे वेंटर्स आणि पोटर्स धूळ जमा झाल्याने ब्लॉक होतात. ज्यामुळे हवेचा फ्लो थांबतो.
म्हणून लॅपटॉप जर वारंवार गरम होत असेल तर त्याला एका चांगल्या सर्व्हिस सेंटरकडे नेऊन रिपेअर करून घ्यावा.
अनेकदा ओरिजनल चार्जर खराब झाल्याने अनेकदा लोकल चार्जरचा वापर केला जातो. जे अनेकदा डिव्हाईसच्या व्होल्टनुसार योग्य नसतात.
हे लोकल चार्जर्स तुमचे डिव्हाईस हिट करू शकतात किंवा तुमचं डिव्हाईस खराब करू शकतात.