सोनं खरेदी करताय? मोबाईलने 2 मिनिटात तपासात येईल शुद्धता

Published by: Pooja Pawar | Oct 11, 2025

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं- चांदी, नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. धनत्रयोदशी ही सौभाग्य, धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं.

Published by: Pooja Pawar | Oct 11, 2025

जर तुम्ही या दिवाळीत सोन खरेदी करण्याची प्लॅनिंग करत असाल तर त्यापूर्वी सोन्याची शुद्धता, हॉलमार्क इत्यादी तपासून घ्या.

Published by: Pooja Pawar | Oct 11, 2025

बऱ्याचदा सणांच्या दिवसात सोने खरेदीत बनावट सोन विकल्याचा प्रकार घडतो. जसे की बनावट हॉलमार्क, लपवलेले मेकिंग चार्जेस इत्यादी. म्हणून, खरेदीदारांनी सोनं खरेदी करताना सावधगिरी बाळगायला हवी.

Published by: Pooja Pawar | Oct 11, 2025

सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेटचे सोने सर्वात शुद्ध असते, तर 14 कॅरेट ते 22 कॅरेट सोने सामान्यतः दागिन्यांमध्ये वापरले जाते.

Published by: Pooja Pawar | Oct 11, 2025

आता सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे. ग्राहकांनी नेहमीच दागिन्यांवर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक कोरलेला आहे याची खात्री करावी.

Published by: Pooja Pawar | Oct 11, 2025

सोन्याची शुद्धता तपासण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग म्हणजे भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या हॉलमार्कद्वारे. आता, BIS हॉलमार्क हा भारतातील मानक आहे. सर्व हॉलमार्क केलेल्या दागिन्यांमध्ये 6-अंकी अल्फान्यूमेरिक HUID कोड असतो.

Published by: Pooja Pawar | Oct 11, 2025

तुम्ही हे BIS केअर मोबाईल ऍपवर तपासू शकता. फक्त कोड एंटर करा आणि तुम्हाला त्वरित माहिती मिळेल. त्यावर ज्वेलर्सचे नाव आणि नोंदणी, हॉलमार्किंग सेंटर, दागिन्यांचा प्रकार, हॉलमार्क तारीख आणि सोन्याची शुद्धता दिसेल.

Published by: Pooja Pawar | Oct 11, 2025

भारतातील प्रत्येक शहरात सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात. तेव्हा तुमच्या शहरातील सोन्याची किंमत जाणून घ्या आणि सर्वात अचूक माहितीसाठी, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सारख्या विश्वसनीय संस्थांकडून दर तपासा.

Published by: Pooja Pawar | Oct 11, 2025

VIEW ALL

Read Next Story