वजन तपासताना 99 टक्के लोकं करतात 'या' चुका

Published by: Zee Team | May 03, 2025

जगभरात 1.5 अब्ज लोकं हे लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. तेव्हा अनेकजण हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. वेट लॉस करत असताना वजन तपासणे हे फारच सामान्य आहे.

Published by: Zee Team | May 03, 2025

पण बऱ्याच जणांना वजन तपासण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहित नसते.

Published by: Zee Team | May 03, 2025

वर्क आउट केल्यावर कधीही वजन तपासू नका. कारण त्यावेळी पाणी प्यायल्याने तुमचं वजन वाढलेलं दिसतं.

Published by: Zee Team | May 03, 2025

महिलांनी मासिक पाळीदरम्यान त्यांचं वजन तपासू नये. कारण यादरम्यान शरीरात सूज आणि ब्लॉटिंग जास्त असते. शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे याकाळात वजन वाढलेलं दिसतं.

Published by: Zee Team | May 03, 2025

रात्री झोपताना वजन तपासू नये. कारण दिवसभर तुमि अनेक गोष्टींचे सेवन केलेलं असते. त्यामुळे रात्री झोपताना तुम्हाला शरीराचं योग्य वजन कळणार नाही.

Published by: Zee Team | May 03, 2025

कार्बोहायड्रेट आणि सोडियम युक्त पदार्थांचे सेवन केल्यावर अजिबात वजन तपासू नये. कारण कार्बोहायड्रेट किंवा सोडियममुळे शरीरात ब्लॉटिंग किंवा सूज येते.

Published by: Zee Team | May 03, 2025

सकाळी रिकाम्यापोटी ही शरीराचं वजन तपासण्याची योग्य वेळ आहे. कारण रात्री तुमची पचनक्रिया पूर्ण होते.

Published by: Zee Team | May 03, 2025

अमेरिका क्विललँड क्लिनिकच्या आहारतज्ज्ञांनी सांगितले की, सकाळी फ्रेश झाल्यावर काहीही न खाता वजन तपासायला हवं. त्यावेळी तुमचं वजन नेमकं किती आहे याविषयी तुम्हाला माहिती मिळेल. वजन तपासत असताना शरीरावर कमी कपडे घालावेत.

Published by: Zee Team | May 03, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | May 03, 2025

VIEW ALL

Read Next Story