अनेकदा हवा आणि ओलसरपणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यास चांदीच्या वस्तू काळ्या पडतात.
चांदीची भांडी धुण्यासाठी महागड्या क्लिनरची गरज नाही. भांड्यांचं क्लिनर बनवण्यासाठी तुम्ही एक मोठा चमचा बेकिंग सोडा, एक चमचा मीठ, गरम पाणी, एक मऊ कपडा आणि अल्युमिनियम फॉईलचा एक तुकडा घ्या.
सर्वात आधी एका भांड्याच्या आतमध्ये अल्युमिनियम फॉईलचे तुकडे लावा.
मग त्यात मीठ, बेकिंग सोडा टाकून गरम पाणी घाला. चांदीच्या वस्तू या पाण्यात पूर्णपणे डुबवा.
15 मिनिटं या पाण्यात चांदीच्या वस्तू राहिल्याने त्यांच्यावरील काळपटपणा दूर होईल. चांदीची भांडी अगदी नव्या भांड्यांसारखी चमकतील.
पाण्यातून बाहेर काढल्यावर भांडी मऊ कपड्याने पुसावीत.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)