अनेकजणांच्या मानेवर घाणीचा जाड काळा थर जमा होतो. तेव्हा मानेवरील हा मळ कसा स्वच्छ करावा यासंदर्भातील जाणून घेऊयात.
साहित्य : तुरटी, मध, हळद, लिंबू
तुरटीची पावडर बनवून घ्या. ही पावडर तव्यावर तोपर्यंत गरम करा जोपर्यंत त्याचं रूपांतर पाण्यात होत नाही.
गॅस बंद करून याला तव्यावर जमा होऊ द्या, मग त्याला खरडवून त्याची पावडर तयार करा.
मग तव्यावर थोडी हळद पावडर सुद्धा रोस्ट करून करा आणि ती तुरटीच्या पावडरमध्ये मिक्स करून त्यात मध टाका.
मानेवर जिथे घाणीचा जाड काळा थर जमा झाला आहे तिथे लावा आणि 10 मिनिटं तसंच राहूद्या जो पर्यंत ते पूर्णपणे सुकत नाही.
लिंबू कापून त्याचे तुकडे मानेवर हलक्या हाताने रगडा असं केल्याने मानेवरील घाणीचा जाड काळा थर स्वच्छ होईल.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही गोष्टीचा त्वचेवर वापर करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)