हिवाळा संपून आता उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे घराघरात आता AC चा वापर वाढणार आहे.
पावसाळा आणि हिवाळ्याच्या दरम्यान जवळपास 6 महीने AC चा जास्त वापर होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात वापर सुरु केल्यावर AC नीट कुलिंग करत नाही अशी तक्रार असते. अशावेळी नेमकं काय करायला हवं याविषयी जाणून घ्या.
सर्वात आधी AC च्या एअर फिल्टरची स्वच्छता करा. AC बंद ठेवल्याने एअर फिल्टरमध्ये धूळ जमा होते, त्यामुळे एसी नीट काम करत नाही. तेव्हा एसी बंद करून त्यातील फिल्टर काढा आणि हलक्या कोमट पाणी तसेच साबणाने धुवा. फिल्टर जाळी धुतल्यावर त्याला नीट सुकवा आणि मग फिल्टर पुन्हा लावा. 15-20 दिवसांच्या अंतराने एअर फिल्टर स्वच्छ केल्याने AC ची कुलिंग वाढते.
AC च्या आउटडोअर युनिटमध्ये कंडेंसर कॉईल असते जी गरम हवा बाहेर काढण्याचं काम करते. मात्र यात शुद्ध धूळ आणि माती जमा होते ज्यामुळे AC नीट कुलिंग करत नाही. अशावेळी ब्रश किंवा वॅक्यूम क्लीनरने स्वच्छता करा. तसेच जास्त धूळ असेल तर तुम्ही हलक्या पाण्याच्या ब्रशने सुद्धा याला धुवू शकता. पण लक्षात घ्या हे करत असताना वायर किंवा पाईपला कोणतेही नुकसान व्हायला नको.
AC मध्ये अनेकदा कूलिंग गॅस सुद्धा संपून जातो, ज्यामुळे नीट कुलिंग होत नाही. कुलिंग गॅस तपासण्यासाठी एसी चालू करून त्याच्या समोर जाऊन उभे राहा. जर कुलिंग कमी होत असेल तर गॅस रिफिलिंग करणाऱ्या टेक्नीशियनला बोलवा.
(इथं दिलेली ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. AC सर्व्हिसिंग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या तसेच गरज असल्यास टेक्नीशियनची मदत घ्या. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)