आवळा खाण्याची योग्य पद्धत कोणती?

Published by: Pooja Pawar | Dec 23, 2025

आवळा पोषकतत्वांनी समृद्ध असून व्हिटॅमिन सीने भरपूर असतं. तसेच आवळा हा फायबर, अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि कॅल्शियमचा सुद्धा चांगला स्रोत आहे.

Published by: Pooja Pawar | Dec 23, 2025

आवळा हा त्याच्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानला जातो.

Published by: Pooja Pawar | Dec 23, 2025

आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Published by: Pooja Pawar | Dec 23, 2025

अनेकजण आवळा चालून किंवा त्याचा ज्यूस काढून पितात. मात्र आवळ्यातील सगळे पोषकतत्व शरीराला मिळावेत यासाठी त्याचे सेवन कशा प्रकारे करावे हे जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Dec 23, 2025

आवळा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी त्याचे योग्य पद्धतीने खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतात.

Published by: Pooja Pawar | Dec 23, 2025

आवळा दोन्ही प्रकारे खाल्ला जाऊ शकतो, मात्र तो चघळून खाल्ल्याने शरीराला अधिक फायदे मिळतात. यामुळे आवळ्यातून मिळणारे सर्व पोषक घटक थेट शरीराला मिळतात आणि दातांचा तसेच जबड्याचा व्यायाम सुद्धा होतो.

Published by: Pooja Pawar | Dec 23, 2025

आवळा आरोग्यासाठी चांगला असला तरी तो सर्वांसाठी योग्य नाही. किडनी स्टोन, मधुमेह, थायरॉईड समस्या आणि सर्दी असलेल्या लोकांना आवळा टाळण्याचा सल्ला दिला जातो.

Published by: Pooja Pawar | Dec 23, 2025

आवळा हा कोलेजनचा सर्वात प्रभावी स्रोत आहे. यात संत्र्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडते, बारीक रेषा येण्याचं प्रमाण कमी होतं.

Published by: Pooja Pawar | Dec 23, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Dec 23, 2025

VIEW ALL

Read Next Story