तुम्ही खाताय तो बासमती तांदूळ प्लास्टिक तर नाही ना? असा ओळखा फरक...

Oct 19,2024


नफा मिळवण्याच्या नादात अनेक दुकानदार भेसळयुक्त तांदूळ बाजारात विकत आहेत. पण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही खऱ्या आणि भेसळयुक्त तांदूळातील फरक ओळखू शकता. जाणून घेऊयात खास टिप्स

तांदळाची चमक

खरे तांदळाला नैसर्गिक चमक असते. पण भेसळयुक्त तांदळाचे असे नसते.

हात लावून बघा

खऱ्या तांदळाला हात लावल्यावर खडबडीत वाटेल. पण भेसळ असलेले तांदूळ गुळगुळीत असतात.

पाणी चाचणी

खरे तांदूळ पाण्यात टाकल्यावर हळू हळू फुलतात. याउलट भेसळयुक्त तांदूळ पाण्यात तरंगतात.

जाळून बघा

खरे तांदूळ जाळल्याने राख होतात. पण खोटे तांदूळ जाळल्याने वितळतात.

चव

भेसळयुक्त तांदूळ दाताने चावल्यास ते बारिक होतील पण तुटणार नाही. पण खरे तांदूळ खाल्यास लगेचच दाता खाली तूटतात.


या उपायांचा वापर करून तुम्ही खऱ्या आणि खोट्या तांदळामधील फरक ओळखू शकतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story