फेस्टिवल सीजनमध्ये ट्रेन तिकिटांवर कसा मिळवायचा 20 टक्के डिस्काउंट?

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

सणांच्या काळात प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाने 'राउंड ट्रिप पॅकेज फॉर फेस्टिवल रश' नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

योजना सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आली असून या योजनेअंतर्गत प्रवाशांना परतीच्या तिकिटांवर 20 टक्के सूट मिळेल.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

ही सवलत प्रवाशांना फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा प्रवाशांनी दोन्ही राउंड ट्रिप तिकिटं एकत्र बुक केली असतील आणि दोन्ही तिकिटं एकाच प्रवासी, वर्ग आणि मार्गासाठी असतील.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

रेल्वे मंत्रालयाचे म्हणणं आहे की, या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात होणारी गर्दी व्यवस्थापित होण्यास, बुकिंग सुलभ करण्यास आणि दोन्ही बाजूंनी गाड्यांचा चांगला वापर सुनिश्चित करण्यास मदत होईल.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

ही योजना सर्व वर्ग आणि सर्व गाड्यांवर (विशेष गाड्यांसह) लागू असेल, परंतु ही सवलत फ्लेक्सी फेअर गाड्यांवर उपलब्ध नसेल. ही ऑफर फक्त कन्फर्म तिकिटांसाठी लागू आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

दोन्ही तिकिटं ऑनलाइन (आयआरसीटीसी वेबसाइट/अ‍ॅपद्वारे) किंवा रेल्वे काउंटरवरून बुक करावी लागतील.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

तिकीट तयार झाल्यानंतर चार्टिंग दरम्यान भाड्यात काही बदल झाल्यास, कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

Published by: Pooja Pawar | Oct 09, 2025

VIEW ALL

Read Next Story