होळी आणि धूलिवंदन साजरी करताना अनेकजण उत्साहाच्या भरपूर भरात भांग पितात.
अनेकांना दिवसभर भांगेचा हँगओव्हर राहतो. अशावेळी हँगओव्हर उतरवायचा कसा याबाबत काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.
भांगेचा हँगओव्हर उतरवायचा असेल तर तुम्ही आंबट गोष्टी खाऊ शकता. आंबट पदार्थांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे नशा वाढवणाऱ्या रसायनांना ते निष्क्रय करते. आंबट पदार्थ म्हणून तुम्ही लिंबू पाणी, मोसंबी किंवा संत्र्याचा ज्यूस, लिंबाचं लोणचं इत्यादींचं सेवन करू शकता.
आल्याचा तुकडा हा भांगेचा हँगओव्हर उतरवण्यास मदत करतो. आल्याचा तुकडा सोलून तोंडात ठेऊन हळू हळू चघळा किंवा आल्याचा चहा बनवून प्या.
नारळ पाणी हे भांगेचा हँगओव्हर उतरवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते आणि भांगेचा हँगओव्हर लवकर उतरवण्यास मदत होते.
भांगेचा हँगओव्हर असलेल्या व्यक्तीला दोन चमचे तूप खायला द्या. तुपाच्या सेवनाने हँगओव्हर उतरण्यास मदत होते. तसेच तुपाचे प्रमाण वाढवायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हॅंगओव्हर उतरवण्यासाठी कॉफी हा लोकप्रिय उपाय आहे. एकाच वेळी कॉफी पिण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने अर्धा अर्धा कप कॉफी प्या.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)