घरात झुरळांचा झालाय सुळसुळाट? मग हे उपाय येतील कामी

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

बऱ्याचदा घरात कितीही स्वच्छता ठेवली तरी झुरळ काही निघून जाण्याचं नाव घेत नाहीत. अशावेळी बाजारात मिळणारे केमिकलयुक्त स्प्रे वापरण्यापेक्षा काही घरगुती उपाय केल्याने झुरळांची ही समस्या सुटू शकते.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

पुदिन्याच्या पानांचा वास खूप तीव्र असतो, जो झुरळांना आवडत नाही. पाण्यात पुदिन्याचे तेल मिसळून ते घराभोवती फवारू शकता. यामुळे झुरळं तिथे प्रवेश करण्यापासून आणि लपण्यापासून रोखता येतील.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

लसूण, कांदा आणि काळी मिरी बारीक करून पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर ती स्प्रे बॉटलमध्ये भरा. जिथे झुरळे दिसतील तिथे फवारा. हा स्प्रे झुरळं पळवण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

तेजपत्त्याचा वास खूप स्ट्रॉंग असतो, जो झुरळांना आवडत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही तमालपत्र बारीक करून दरवाज्यावर, कपाटांवर आणि झुरळे जास्त दिसतात अशा कोपऱ्यात ठेवू शकता. यामुळे झुरळं तिथे प्रवेश करण्यापासून आणि लपण्यापासून रोखता येतील.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते, त्यामुळे ते झुरळांना दूर ठेवण्यास मदत करते. लिंबाचा रस थोड्या पाण्यात मिसळा आणि फवारणी करा. यामुळे लादी सुद्धा स्वच्छ होईल आणि त्याच्या वासाने झुरळ तेथे येणार नाहीत.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

व्हिनेगरचा वास झुरळांना आवडत नाही. अशा परिस्थितीत पांढरा व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि तो स्प्रे बॉटलमध्ये भरून फवारणी करा.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

VIEW ALL

Read Next Story