ओठांच्या बाजूचा भाग काळवंडलाय? हे घरगुती उपाय वापरुन पाहाच!

ओठांच्या बाजूच्या त्वचेवर काळे डाग पडलेत, त्यामुळं तुमची स्माइल खराब होतेय.

Mansi kshirsagar
Mar 25,2024


ओठांभोवती काळे डाग हा एक हायपरपिग्मेंटेशनचा भाग आहे. हार्मोनल बदलामुळं असे घडत असते.


नैसर्गिंक उपायांनी तुम्ही हा काळेपणा दूर करु शकतात. त्या साठी आज आम्ही तुम्हाला एक मास्क सांगणार आहोत


तांदळाचे पीठ, हळद, दही, लिंबाचा रस, टोमॅटोचा रस

कृती

सर्वप्रथम एका वाटीत तांदळाचे पीठ, हळद, दही, लिंबाचा रस आणि टोमॅटोचा रस घेऊन सर्व साहित्य एकत्र करुन घ्या


सर्व साहित्य व्यवस्थीत एकजीव करुन त्याची पेस्ट करुन घ्या.


आता ही पेस्ट जिथे काळे डाग पडलेत किंवा काळवंडलेला भाग असेल त्यावर लावा


पेस्ट सुकल्यानंतर एक फडका थोडा ओला करुन त्याने पेस्ट काढून टाका. किंवा मग थंड पाण्याने चेहरा धुवून टाका


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story