उन्हाळ्यात घामामुळे केसात उवा झाल्यात? वापरा घरगुती उपाय

Pooja Pawar
May 03,2025


उन्हाळ्यात घामामुळे केसांमध्ये उवा आणि लिखा होतात. उवांमुळे केसांमध्ये खाज येण्याचं प्रमाण वाढतं जे त्रासदायक ठरतं.


केसांमधील लिखा आणि उवा काढण्यासाठी तुम्ही केसांमध्ये व्हिनेगरचा वापर करू शकता.


व्हिनेगर केसांवर डायरेक्ट अप्लाय न करता एक कप कोमट पाण्यात मिक्स करा.


व्हिनेगरचं हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून केस विंचरताना केसांवर शिंपडा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या व्हिनेगर मिश्रणाचं वापर केल्यास केसांमध्ये येणाऱ्या उवा आणि लिखांपासून सुटका मिळते.

दुसरा उपाय :

नारळाचं तेल आणि कापूर एकत्र उकळून ते केसांवर लावल्याने उवा आणि लिखांपासून सुटका मिळते. हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावा आणि व्यवस्थित केस विंचरा.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story