रात्रीचे खूप मच्छर चावतात? 'या' घरगुती उपायांनी लगेच होईल सुटका

Pooja Pawar
Apr 17,2025


संध्याकाळ झाली की अनेकदा घरात मच्छर हैदोस घालतात. रात्रीच्यावेळी अंधारात मच्छरांच्या चाव्यामुळे झोप लागत नाही.


तेव्हा मच्छरांपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.


लसूणचे पाणी घरातजवळ शिंपडल्याने मच्छर आजूबाजूला सुद्धा येणार नाहीत.


पुदिन्याचं तेल सुद्धा मच्छरांवर प्रभावी ठरतो. याची मच्छरांना पळवून लावण्यासाठी मदत होते.


कडुलिंबाचं तेल हे खूप कडवट असतं ज्यामुळे मच्छर यापासून दूर पळतात.


कांदे घरातील कानाकोपऱ्यात ठेवल्यास मच्छर घरात येत नाहीत.


घरात कापूर जाळल्यास काही मिनिटांचं मच्छर दूर पळतात.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन किंवा वापर करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story