धावपळीची जीवनशैली आणि चांगल्या आहाराचा अभाव इत्यादींमुळे पोटाशी निगडित अनेक समस्या जाणवू लागतात.
बडीशेपच्या आतमध्ये अनेक प्रकारचे गन आढळतात. ज्यात मॅग्नेशियम, झिंक, फायबर यांचा समावेश असतो.
बडीशेपच्या सेवनाने त्यात असलेल्या पोषकतत्वामुळे पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
लिंबाच्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, सोडियम, सायट्रिक ऍसिड इत्यादी पोषकतत्व असतात.
जेवणावर लिंबू पिळून खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या कमी होते.
आल्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच यात झिंक आणि कोपरचे गुण सुद्धा आढळतात.
सकाळी रिकाम्यापोटी आल्याचे पाणी प्यायल्याने पोटाशी निगडित अनेक समस्या दूर होतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)