गरोदरपणात येणारे स्ट्रेच मार्क्स कसे हटवायचे? वापरा घरगुती उपाय

Published by: Pooja Pawar | Jul 16, 2025

गरोदरपणात महिलांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात. हे स्ट्रेच मार्क्स खूप सामान्य असतात मात्र काही लोकांच्या शरीरावरील हे मार्क्स खूप गडद असतात.

Published by: Pooja Pawar | Jul 16, 2025

गरोदरपणात येणारे स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय सुद्धा वापरू शकता. जे प्रभावी ठरू शकतात.

Published by: Pooja Pawar | Jul 16, 2025

एलोवेरा जेल :

त्वचेसाठी एलोवेरा जेल हे खूप फायदेशीर ठरते. स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी एलोवेरा जेल लावा आणि १० ते १५ मिनिट चोळा, मग हलक्या पाण्याने धुवून टाका. तुम्ही व्हिटॅमिन ए आणि इ च्या गोळ्या एलोवेरा जेलमध्ये टाकून त्याने रात्री मालिश करू शकता.

Published by: Pooja Pawar | Jul 16, 2025

तेल मालिश :

त्वचा मुलायम आणि फ्लेक्सिबल बनवल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात. अशावेळी तुम्ही स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी तेल मालिश करू शकता. नारळाच्या तेलाने मालिश केल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास खूप फरक पडू शकतो.

Published by: Pooja Pawar | Jul 16, 2025

मधाचा लेप :

2 चमचे मध स्ट्रेच मार्क्सवर लावून ते थोडावेळ सुकू द्या. मग त्याला पाण्याने स्वच्छ करा. मधात अँटी ऑक्सिडंटचे गुण असतात ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स हटवण्यात मदत होते.

Published by: Pooja Pawar | Jul 16, 2025

हळद आणि चंदन :

संपूर्ण हळदीचा एक तुकडा आणि चंदनाचा एक तुकडा घेऊन घासा. ते पाण्यात भिजवून पेस्ट तयार होईल आणि स्ट्रेच मार्क्सवर लावल्यास ते कमी होऊ शकतील. सुमारे 6 महिने हे उपाय करावा लागतील.

Published by: Pooja Pawar | Jul 16, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा किंवा त्वचेवर लावण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Jul 16, 2025

VIEW ALL

Read Next Story