30 दिवसात केस कसे वाढवायचे?
साधारणपणे आपले केस हे महिन्याला अर्धा इंच वाढतात. आम्ही तुम्हाला असे टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमचे केस 30 दिवसांत 1 इंचापर्यंत वाढतील.
केस लवकर वाढवायचे असतील तर आवळ्याचं सेवन करा. आवळ्यात जस्त आणि लोह असतं जे केसाच्या वाढीस फायदेशीर मानलं जातं.
तसंच तुम्ही मासे खायला सुरुवात करा. फ्रिशमध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 आणि प्रथिने आढळतात. केस वाढीसाठी तुम्ही फ्रिश ऑइल पण लावू शकता.
केसांची जलद वाढव होण्यासाठी रोझमेरी, रीठा आणि ग्रीन टी सारख्या हर्बल अर्कांनी केस धुवा.
यासोबत तुम्ही अंकुरलेली मेथी खायला पाहिजे. मेथीचं तेलही केसाला लावू शकता. मेथीमधील प्रथिने केस लांब आणि जाड करण्यास उपयुक्त ठरतात.
ताणमुक्त राहा अन्यथा केस गळती होईल. केस वाढीसाठी बालासन योग करा.
ओले केस कधीही विंचरु नका.कारण त्यामुळे केस तुटतात. ओल्या केसांवर उष्णता साधनेही वापरू नका.
केस लांब करण्यासाठी नारळाचे तेल लावा. फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध आहे, जे केसांच्या मुलांना खोलवर पोषण देऊ शकतात.
केस जलद वाढीसाठी अक्रोड, बदाम खा. तसंच दररोज काकडीचं सेवन करा.