सणासुदीला जेवणासाठी आणलेलं पनीर अस्सल की भेसळयुक्त? कसं ओळखाल?

Published by: Sayali Patil | Oct 13, 2025

पनीरला मानाचं स्थान

सणावाराच्या दिवसांमध्ये घराघरांमध्ये चमचमीत पदार्थ बनतात आणि त्यात पनीरला मानाचं स्थान मिळतं. पण, यामध्ये होणारी भेसळ इथं विसरून चालणार नाही.

Published by: Sayali Patil | Oct 13, 2025

भेसळ

पनीरमध्ये सर्रास भेसळ केली जाते, भेसळयुक्त पनीरला अॅनालॉग पनीर म्हणूनही ओळखतात. बनावट पनीर घरच्याघरीसुद्धा ओळखता येतं.

Published by: Sayali Patil | Oct 13, 2025

लहानसा तुकडा

पनीर भेसळयुक्त आहे की नाही हे पाहण्यासाठी एक लहानसा तुकडा बोटानं चिरडून पाहा. अस्सल पनीर नरम आणि मऊसूत असतो आणि सहज तुटतो. बनावट पनीर हातांना खोडरबरसारखा भासतो.

Published by: Sayali Patil | Oct 13, 2025

फायर टेस्ट

पनीरचा लहानसा तुकडा गॅलवर मंद आचेवर ठेवला (थेट आचेवर) असता अस्सल पनीर लगेच वितळतं, पाणी सोडतं आणि त्यातून दुधासारखा गंध येतो. भेसळयुक्त पनीरमधून केरोसिनसारखी दुर्गंधी येते.

Published by: Sayali Patil | Oct 13, 2025

पॅन हिट टेस्ट

एका कोरड्या पॅनमध्ये तेल किंवा पाण्याशिवाय पनीरचा तुकडा गरम करा. अस्सल पनीर सहजपणे पाणी सोडतं, काहीसं आकुंचन पावतं आणि पिवळसर पडतं, मात्र त्याचा आकार कायम राहतो. भेसळयुक्त पनीर पॅनवर गरम केल्यास ते तुटण्यास सुरुवात होते. ते करपू लागतं मात्र वितळण्यास सुरुवात होत नाही.

Published by: Sayali Patil | Oct 13, 2025

आयोडिन टेस्ट

मेडिकलमध्ये मिळणाऱ्या आयोडिन टिंचरच्या माध्यमातून ही चाचणी करता येते. जिथं पनीरवर 2 ते 3 थेंब आयोडिन टाकल्यास अस्सल पनीरचा रंग बदलत नाही.

Published by: Sayali Patil | Oct 13, 2025

लक्षात घ्या....

भेसळयुक्त पनीरमध्ये स्टार्च असल्यास तो निळा किंवा काळा पडतो. ही बाब लक्षात घेण्याजोगी. लिंबाचा रस टाकूनही ही भेसळ ओळखता येते. जिथं बनावट पनीर आकुंचन पावतो, तर अस्सल पनीर लिंबाच्या रसानं आंबट होतो.

Published by: Sayali Patil | Oct 13, 2025

VIEW ALL

Read Next Story