आंबा गोड आहे की आंबट कसे ओळखाल?

Apr 28,2024

रंगापेक्षा सालीवरुन ओळखा

जेव्हाही तुम्ही आंबा खरेदी करता तेव्हा त्याच्या रंगापेक्षा त्याच्या सालीकडे जास्त लक्ष द्या. आंबा नैसर्गिकरित्या पिकलेला असेल तर त्याच्या सालीवर एकही डाग नसतो. पण आंबा रसायनांमध्ये पिकवला असेल तर सालीवर काळे डाग दिसतात. रंगावरुनही आंबा ओळखता येतो.

देठावरुनही ओळखा

आंब्याच्या देठाभोवती दाब असल्यास, आणि बाकीचा भाग फुगीर आणि मऊ असल्यास, आंबा पूर्णपणे पिकलेला आणि ताजा आणि गोड असतो.

आंब्याचा वास घ्या

जर तुम्हाला आंब्याच्या देठाचा वास येत असेल, तसेच एकदम गोड, मधूर वास येत असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा खरेदी करत आहात असे समजून घ्या. पण आंब्याला अल्कोहोल किंवा रसायनांचा वास येत असेल तर असा आंबा चुकूनही विकत घेऊ नये.

आंबा दाबून तपासा

आंबा विकत घेताना लक्षात ठेवा की, तो जास्त घट्ट नसावा आणि जास्त चपटाही नसावा. कारण खूप टनक असलेला आंबा आतून कच्चा असू शकतो, तर चिरल्यावर तो आतून कुजलेला असू शकतो. त्यामुळे नेहमी मऊ आंबा खरेदी करा.

असे आंबे अजिबात खरेदी करु नका

आंबा तुमच्या सर्व पॅरामीटर्समध्ये बसत असला आणि जरी तो ताजा आणि गोड दिसत असला तरी खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आंब्याला कुठेही छिद्र पडले असेल किंवा फुटला असेल किंवा कापला गेला असेल तर अजिबात खरेदी करू नका, अशा आंब्यात किडे असतात.


साधारणपणे ही समस्या दसरी आंब्यामध्ये अधिक दिसून येते. याशिवाय आंबा विचित्र वास येत असला तरी खरेदी करणे टाळावे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story