पदार्थांची चव वाढवण्यापासून ते अगदी त्या पदार्थाला शेवटचा टच देईपर्यंत अर्थात त्याच्या सजावटीपर्यंत कोथिंबिरीचा वापर केला जातो.
मात्र बऱ्याचदा बाजारातून आणलेली ही कोथिंबीर दोन दिवसांतच काळी पडण्यास सुरुवात होते. अशा वेळी नेमकं काय करावं?
कोथिंबीर स्वच्छ धुवून झिपलॉक बॅगेत लहान छिद्र करून ठेवल्यास ती ताजी टवटवीत राहते.
थोड्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून कोथिंबीरीवर हलक्यानं फवारल्यास ती ताजी राहण्यास मदत मिळते.
कोथिंबीर स्वच्छ करून ती एका हवाबंद डब्यात पेपर टॉवेलवर ठेवल्यास त्यातील बाष्पाचं प्रमाण कमी होतं.
कोथिंबीर मुळासकट पाण्यात ठेवत पानांच्या भागाला पॉलिथीनध्ये बांधल्यासही ती ताजी राहते. मात्र, दर दोन दिवसांनी त्यातील पाणी मात्र आवर्जून बदलावं.
थोडक्यात काय, तर एक नव्हे कैक पद्धतींनी कोथिंबीर ताजी टवटवीत ठेवता येते. त्यामुळं वरील एखादा उपाय वापरून पाहाच.