आलू शेव किंवा भुजिया सर्वांनाचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.
संध्याकाळच्या चहासोबत कुरकुरीत आणि चटपटीत आलू शेव मिळाली तर, चहाची चवही आणखीनच वाढते.
बऱ्याचदा बाजारात पॅकेटमध्ये मिळणारी आलू शेव तेलकट असते. ती खाल्ल्यास अॅसिडिटी होण्याची शक्यता असते.
पण काळजी करू नका ही चमचमीत आलू शेव तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
आलू शेव बनण्यासाठी साहित्य -उकडलेले बटाटे, बेसन, तांदळाचे पिठ, लाल तिखट, हळद , हींग, आमचूर पावडलर, मीठ आणि तेल.
सर्वप्रथम उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. त्यात बेसन, तांदळाचे पिठ, मीठ आणि सर्व मसाले घालून एकत्र करा.
या सुक्या मिश्रणात गरम तेलाचे मोहन घाला. नंतर हळूहळू पाणी घालून घट्टसर पिठ मळून घ्या.
आता शेवेच्या साच्यात असेल तर त्यात पिठाचा गोळा घाला. एका ताटात शेव पाडून घ्या.
शेवेचा साचा नसेल तर पायपिंग बॅगचा वापर करू शकता. यानंतर शेव गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या.
तळलेली शेव टिशू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल. शेव थंड होण्यासाठी ठेवा. नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
शेव गरम असताना डब्यात भरली तर कुरकुरीतपणा जास्तकाळ टिकणार नाही.
तयार झालेली आलू शेव, भेळेमध्ये, चहासोबत किंवा कोणत्याही भाजीवर घालून खाऊ शकता.