घरच्या घरी कसं बनवाल वांग्याचं लोणचं?

Sayali Patil
Jan 08,2026

वांग्याची भाजी

वांग्याची भाजी ही प्रांताप्रांतानुसार तितक्याच प्रकारे बदलते आणि त्याच पद्धतींनी बनवलीसुद्धा जाते. जी चवीला तितकीच उत्तमही लागते.

वांग्याचं लोणचं

वांग्याची भाजी, वांग्याचं भरित किंवा वांग्याचे काप तर तुम्ही खाल्लं असेल, पण वांग्याचं लोणचं कधी खाल्लं आहे का?

साहित्य

वांग्याचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, वांगे, राईचं तेल, हळद, लाल मिरची पूड, धनेपूड, जीरं, बडिशोप पावडर, साखर, आले, मीठ, व्हिनेगर.

कृती

सर्वप्रथम कडकडीत तेलात बडिशोप टाकून त्यामध्ये वांग्याचे तुकडे टाका.

मसाले

वांग्याचा रंग काहीसा सोनेरी झाल्यानंतर इतर मसाले त्यात टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्या.

व्हिनेगर

5 ते 10 मिनिटांपर्यंत वांगी शिजल्यानंतर त्यात व्हिनेगर टाका. वांगी शिजल्यानंतर गॅस बंद करा.

उत्तम चव

हे मिश्रण थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरा म्हणजे ते दीर्घकाळ टीकेल. वांग्याचं हे लोणचं वरणभात, पोळी, वाफाळता भात, पराठा यांसोबतच उत्तम लागेल.

VIEW ALL

Read Next Story