दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो हवाय? घरच्या घरी 'असे' तयार करा शुद्ध उटणं

Oct 26,2024


दिवाळी असू द्या किंवा लग्न समारंभ सुंदर दियासला सगळ्यांनाच आवडतं. यासाठी आता तुम्ही घरच्याघरी उटणं तयार करू शकता.


रात्री झोपण्यापूर्वी संत्र सोलून त्याची सालं एका ताटात ठेवा. सकाळ पर्यंत ते वाळतील. तुम्ही दिवसा उन्हातही ही सालं वाळवून घेऊ शकता.


त्यानंतर 2 चमचे मसूर डाळ, तांदूळ आणि आळशी समान प्रमाणात घेऊन तव्यावर भाजून घ्या


तोपर्यंत वाळवून घेतलेले संत्र्याची सालं मिक्सरमधून बारिक करून घ्या.


थोडेसे केसर एका टिशू पेपरमध्ये घेऊन त्याच तव्यावर ठेऊन कोरडे करून घ्या.


नंतर या सगळ्या गोष्टी थंड झाल्यावर एक भांड्यात काढून त्यात एक चमचा ज्येष्ठमध पावडर, कस्तुरी हळद, बेसन आणि 2 चमचे साखर घाला.


या सगळ्या गोष्टी एकत्र मिस्करमधून बारिक करून घ्या. हे मिश्रण तुम्ही अनेक महिने तयार करून ठेऊ शकता.


त्यात दूध, दही किंवा गुलाब पाणी घालून तुम्ही चेहऱ्याला किंवा स्क्रब सारखं अंगाला लावू शकता.


यानंतर तुम्हाला कोणत्याच फेशियल किंवा क्रिमची गरज पडणार नाही.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story