हिवाळ्यात चहा व्यतिरिक्त सर्वांचे आवडते पेय म्हणजे 'हॉट चॉकलेट'.
या काही सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही घरच्या घरी 'हॉट चॉकलेट'बनवू शकता.
दूध, कोको पावटर, साखर, व्हॅनिला इसेन्स, मीठ
एका सॉसपॅनमध्ये कोको पावडर, साखर आणि चिमूठभर मीठ हे मिश्रण एकत्र करून घ्या.
या मिश्रणात गरजेनुसार दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून मंद आचेवर उकळू द्या.
साखर दूधात मिसळे पर्यंत मिश्रण ढवळत रहा.
वाफ येऊ लागली आणि मिश्रण थोडे घट्ट झाले की तेव्हाच गॅस बंद करा.
गरमागरम हॉट चॉकलेट तुमच्या आवडत्या टॉपिंग्जने सजवून सर्व्ह करा.