भोपळ्याची भाजी खायला मुलं नाक मुरडतात, 'हा' चविष्ट पदार्थ बनवून द्या!

Mansi kshirsagar
May 03,2025


भोपळ्याची भाजी खायची म्हणजे मुलं खूप कंटाळा करतात. पण तुम्ही याच भोपळ्यापासून वेगळा पदार्थ करुन पाहा


पण तुम्ही भोपळ्यापासून पुऱ्या बनवू शकतात. जाणून घ्या रेसिपी


सगळ्यात आधी भोपळा चिरून घ्या आणि चांगला उकडवून घ्या. नंतर त्यात गुळ आणि मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करा


आता त्यात रवा, तांदळाचे पीठ आणि गव्हाचे पीठ टाकून पीठ चांगलं मळून घ्या आणि त्याच्या पुऱ्या करायला घ्या.


आता तेल चांगलं तापल्यानंतर पुऱ्या तळून घ्या आणि थंड दह्यासोबत खायला घ्या


मुलंदेखील या भोपळ्याच्या पुऱ्या मिटक्या मारत खातील.

VIEW ALL

Read Next Story