चैत्र महिन्यात हमखास घराघरात कैरीची डाळ केली जाते. जाणून घेऊया याची रेसिपी
1 कैरी, 1 वाटी चण्याची डाळ, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, आल्याचा तुकडा, फोडणीपुरते तेल, हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर
चण्याची डाळ 2-3 तास भिजत घालावी. नंतर कैरीची सालं काढून ती चांगली किसून घ्यावी
हिरव्या मिरचीचे मध्यम तुकडे करावीत, आल्याचे साल काढून त्याचे पण तुकडे करावेत.
आता मिक्सरमध्ये कैरी, डाळ, आले, मिरची घालून मिश्रण एकजीव करावे. मिश्रण फार बारीक करु नये. जरा खडबडीतच ठेवावे
आता एका भांड्यात हे मिश्रण काढून त्यात चिमूटभर साखर पेरावी. नंतर तेलाची खंमग फोडणी डाळीवर द्या आणि छान एकजीव करा. फोडणीची डाळ तयार