हटके स्वीट डिश खायची आहे? बनवा केशर मखाना खीर

Tejashree Gaikwad
Jul 25,2025


नेहमीचेच गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर केशर मखाना खीर हा उत्तम पर्याय आहे.

लागणारे साहित्य

मखाना 1 कप, दूध 1 लिटर, साखर 1/3 कप, केशर, साजूक तूप 1 टेबलस्पून, काजू 7-8, बदाम 6-7, पिस्ता 6-7, वेलची पूड 1/4 टीस्पून


एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मखाना टाकून 5-6 मिनिटं मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.


नंतर थोडे थंड झाल्यावर अर्धे मखाने फूड मिक्सरमध्ये थोडे क्रश करून ठेवा.


दूध गरम करून थोडं घट्ट होऊ लागलं की त्यात केशराचे धागे टाका.


आता त्यात भाजलेले मखाने आणि काजू-बदाम टाका. काही मिनिटं हे मिश्रण मध्यम आचेवर शिजू द्या.


मखाने नरम झाले की त्यात साखर आणि वेलची पूड घाला. आणखी 5-7 मिनिटं शिजू द्या, खीर तयार आहे.

VIEW ALL

Read Next Story