खरवस हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे.
तुम्ही घरीदेखील गुळाचा खरवस बनवू शकता
हल्ली चिकाचे दूध मिळणे खूप मुश्कील झाले आहे. अशावेळी तुम्ही चिकाच्या दुधाशिवायदेखील खरवस बनवू शकता
1 कप दूध, मिल्क पावडर, 1 कप दही, कंडेन्स मिल्क, 1 कप वेलची पूड, अॅल्यूमिनियम फॉइल, पाणी
एका मोठ्या पातेल्यात दूध घेऊन त्यात एक कप मिल्क पावडर घाला आणि एकजीव करुन घ्या
त्यानंतर यात दही टाकावे आणि दही नीट एकजीव करा. आता त्यात कंडेन्स मिल्क घालून ते एकजीव करुन घ्या
आता अॅल्युमिनियम फॉइलने हे मिश्रण झाकून घ्या. आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यावर स्टँड ठेवा आणि तयार झालेले मिश्रण 30-40 मिनिटे वाफवून घ्या