आल्याचा चहा

आधी की नंतर, चहा बनवताना त्यात आलं नेमकं कधी टाकावं?

चहाचे कैक फायदे

आल्याचा चहा सर्वांच्याच आवडीचा. त्याचे शरीरालाही कैक फायदे. आसा हा आल्याचा चहा योग्य पद्धतीनं कसा बनवतात तुम्हाला माहितीये?

आलं कधी मिसळावं?

लक्षात घ्या, चहामध्ये आलं कायमच पाणी उकळल्यानंतरच मिसळा. काही मंडळी चहामध्ये आलं ठेचून टाकतात.

ठेचलेलं आलं नको

ठेचलेल्या आल्यामुळं त्याची मूळ चव चहात मिसळली जात नाही. परिणामी चहामध्ये आलं कायमच किसूनच टाकावं.

आल्याचा किस

आल्याचा किस टाकल्यामुळं तो चहामध्ये व्यवस्थित मिसळतो आणि चहाला आल्याची चव येते. अशानं आलं वायासुद्धा जात नाही.

आल्याचं प्रमाण

आल्याचा चहा बनवत असताना त्याचं प्रमाण लक्षात घेणंही गरजेचं. त्यामुळं आलं कमी किंवा जास्त नव्हे तर योग्य प्रमाणात टाकण्याकडेही कायम लक्ष द्या.

चहाचा आस्वाद!

आल्याचा चहा उन्हाळ्यामध्ये पिणं शक्यतो टाळा. हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये मात्र हा चहा तुम्ही पिऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story