मऊसूत, मोकळा...; बासमती भात बनवताय? 'या' टीप्स वापराच

Nov 12,2024

बासमती

टोकदार, फळफळीत आणि मोकळ्या दाण्याचा बासमती भात अनेकांनाच आवडतो. पण, काही मंडळी हा भात बनवताना इतके गोंधळतात की भात चिकट होऊन साराच हिरमोड करतो.

पाण्यात भिजवून ठेवा

बासमती तांदूळ शिजवण्याआधी धुवून किमान अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवावा. असं केल्यानं तांदळाचा दाणा तुटत नाही.

पाण्याचं प्रमाण

बासमती भात बनवत असताना तांदळामध्ये पाणी योद्य प्रमाणात पडलं नाही तरीही भात गडबडतो. त्यामुळं पाण्याचं प्रमाण कायम लक्षात ठेवा.

तांदुळ

साधारण एक कप बासमती तांदळासाठी 1.5 ते 2 कप पाणी गरजेचं असतं. तांदुळ शिजवण्याआधी पाण्यात ठेवल्यामुळं ते पाणी शोषून घेतता आणि लवकरत शिजतात.

उकळतं पाणी

बासमती तांदुळ शिजवताना तो पाण्यासोबत एकत्र आचेवर ठेवू नये. आधी पाणी उकळून घ्यावं आणि त्यानंतर आच धीमी करून त्यात तांदूळ सोडावे.

शेवटचा टप्पा

बासमती तांदुळ शिजल्यानंतर त्यावर झाकण ठेवून काही मिनिटं भात वाफेतच फुलू द्या. असं केल्यानं तांदळाचा दाणा मऊसूत होतो.

VIEW ALL

Read Next Story