चिकन तंदुरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं.
पण नेहमी बाहेर मिळणारी चिकन तंदुरी खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीही अगदी होटेल स्टाईल तंदुरी बनवू शकता.
यासाठी तुम्हाला ओव्हेन किंवा तंदुरचीही गरज भासणार नाही. कढईतच ही चिकन तंदुरी बनता येईल.
सर्वप्रथम चिकन लेगपिस स्वच्छ धुवून घ्या. एका मोठ्या भांड्यात काढा.
त्यावर लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट आणि भरपूर मीठ घालून चांगले एकत्र करा. 15 मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवा.
आता एका कढईत एक लहान वाटी मोहरीचे तेल गरम करा. त्यात अर्धी वाटी कश्मीरी लाल तिखट घाला.
हे तेल एका भांड्यात काढा. त्यात कसूरी मेथी, गरम मसाला, लाल तिखट, धणे-जिरे पावडर, चिकन मसाला, चाट मसाला आणि मीठ घाला.
सर्व मसाले तेलात एकत्र करून त्यात एक लहान वाटी घट्ट दही घाला. चांगले फेटा. मित्रण तयार करा.
या मिश्रणात मॅरिनेट केलेले चिकन लेगपिस घालून व्यवस्थित कोट करा. 2 मिनिटे झाकून ठेवा.
आता एका कढईत स्टँड ठेवून त्यावर भांडे ठेवा. 10 मिनिटे कढई प्रीहीट होऊ द्या. नंतर त्यात चिकन लेगपिसचे तुकडे ठेवा.
कढईवर झाकण ठेवा. 20 ते 25 मिनिटे मध्यम आचेवर वाफू द्या. टूथपिकच्या मदतीने चिकन शिजले आहे की नाही हे तपासा.
आता गॅसवर एक जाळी ठेवून मध्यम फ्लेमवर चिकन लेगपिस सर्व बाजूंनी भाजून घ्या.
स्मोकी फ्लेवर येण्यासाठी भाजलेले चिकन लेगपिस एका भांड्यात ठेवून मधोमध भाजत्या कोळशाचा तुकडा ठेवून त्यावर तूप ओता. लगेच झाकण ठेवा.
नंतर गरमा गरम मसालेदार घरगुती चिकन तंदुरीवर लिंबू पिळून, हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.