इडली... जवळपास संपूर्ण भारतातच अनेकांच्या आवडीचा पदार्थ. परदेशातसुद्धा इडली आवडीनं खाल्ली जाते.
सहसा इडली हा खाद्यप्रकार दक्षिण भारतीय कुटुंबांमध्ये उत्तमरित्या बनवली जाते. तर, अनेकांनाच रेस्तराँमधील इडली आवडते.
काही घरांमध्ये रेस्तराँस्टाईल इडली बनवण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो. पण, ही इडली इतकी सॉफ्ट कशी असते माहितीये?
परफेक्ट इडलीच्या पिठासाठीचं प्रमाण म्हणजे एक वाटी तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळी स्वच्छ धुवून 4 ते 6 मिनिटं भिजवा. उडीद डाळीत अर्था चमचा मेथीचे दाणे टाका. यानं पीठ लवकर आंबतं.
उडीद डाळ अगदी बारीक वाटून घ्या आणि तांदळाचे दाणे काहीसे भरड वाटून दोन्ही वाटणं मिसळा. लक्षात घ्या पीठ जास्त पातळ आणि घट्ट राहणार नाही.
आता हे पीठ 8 ते 10 तासांसाठी एखाद्या उबदार ठिकाणी दुप्पट होईपर्यंत आंबवण्यासाठी ठेवा. इडली पात्रात हे मिश्रण टाकण्याआधी पात्राला तेल किंवा तूप लावा.
इडली 10 ते 12 मिनिटं धीम्या आचेवर वाफेवर शिजवा आणि पाहा अगदी रेस्तराँ स्टाईल इडली तयार!!!