नंबर सेव्ह न करता WhatsApp कॉल कसा करायचा? जाणून घ्या ट्रिक

तेजश्री गायकवाड
Jun 11,2025


WhatsApp हे एक अतिशय लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचा अनेक प्रकारे वापर केला जातो.


पण यामध्ये एक अडचण अशी होती की तुम्ही नंबर सेव्ह केल्याशिवाय Whatsappवर नंबर सेव्ह न करता कॉल करू शकत नाही.


आज हीच समस्या सोडवून आम्ही नंबर सेव्ह न करताही तुम्ही Whatsappवर कसा कॉल करू शकता ते सांगणार आहोत.


ही ट्रिक कॉमन ग्रुप वापरकर्त्यांना लागू होत नाही, तिथे तुम्ही फक्त नंबरवर क्लिक करू शकता आणि मेसेज पाठवू शकता.


तुमच्या प्रोफाइलमध्ये जा आणि तुमचा नंबर अ‍ॅड करा, तुम्हाला ज्या नंबरवर कॉल करायचा आहे तो नंबर टाइप करा आणि तो स्वतःला पाठवा.


जर तुमच्याकडे त्या नंबरवर WhatsApp असेल तर त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला कॉल किंवा मेसेज करण्याचा पर्याय मिळेल.


अशा प्रकारे तुम्ही नंबर सेव्ह न करता Whatsappवर कॉल करू शकता.

VIEW ALL

Read Next Story