होळी खेळण्यापूर्वी केसांची काळजी कशी घ्यावी? वापरा 5 टिप्स

Pooja Pawar
Mar 07,2025


होळी खेळताना वापरले जाणारे रंग हे केसांसाठी हानिकारक असू शकतात. या रंगांमुळे केस कमजोर आणि खराब होऊ शकतात. तेव्हा होळी खेळण्यापूर्वी केसांसाठी काही टिप्स फॉलो केल्यास केस सुरक्षित राहतील.


होळी खेळण्यापूर्वी केसांना तेल लावावे. यासाठी तुम्ही नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल इत्यादी केसांवर लावू शकता. ज्यामुळे केसांना रंग सहज लागून राहत नाही आणि केस डॅमेज होण्यापासून वाचतात.


शक्य असल्यास होळी खेळण्यापूर्वी तुम्ही टोपी, स्कार्फ इत्यादींचा वापर करून केस झाकून ठेऊ शकता. ज्यामुळे केसांना रंग लागणार नाही.


होळी खेळताना केसं बांधलेली राहतील अशी हेअरस्टाईल ठेवा. केस मोकळी सोडल्यास त्यात गुंता जास्त होतो तसेच रंग सुद्धा लागतो.


होळी खेळणार असाल तर नैसर्गिक रंगांचा वापर करावा. जेणेकरून यामुळे शरीराला कोणताही अपाय होणार नाही.


होळी खेळून झाल्यावर केसातील रंग काढण्यासाठी माईल्ड शॅम्पू वापरा आणि केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. अन्यथा केस खूप जास्त रफ होतील.


केसांना पोषण मिळावं यासाठी केस धुतल्यावर त्याला डीप कंडिशनिंग करा. यामुळे केसांना हायड्रेशन मिळते. तसेच तुम्ही दही, अंड आणि एलोवेरा इत्यादी हेअरमास्कचा वापर करू शकता.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही गोष्टीचा वापर केसांमध्ये करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story