पावसाळ्यात दमट वातावरण आणि ओलसरपणामुळे शरीरातील विविध भागांच्या त्वचेवर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
तेव्हा पावसाळ्यात फंगल इंफेक्शन होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात.
पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा धोका टाळण्यासाठी आरामदायक सुती कपडे घालावेत. सैल कपड्यांमुळे हवा खेळती राहते आणि शरीर ओलसर राहणार नाही.
फंगल इंफेक्शनचा धोका टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. अशावेळी बाहेरून आल्यावर अँटी फंगल साबणाने हात आणि पाय स्वच्छ करावेत.
पावसाळ्यात भिजल्यावर ओले कपडे अंगावर जास्तवेळ ठेऊ नये. असं झाल्यास फंगल इंफेक्शनचा धोका होऊ शकतो. पावसात भिजला असाल तर शक्य तितक्या लवकर ओले कपडे बदल किंवा ते कपडे लवकर सुकवण्याचा प्रयत्न केला.
कोणत्याही ऋतूमध्ये स्वतःला हायड्रेट ठेवा. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहील आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होईल. चांगला आहार आणि हायड्रेटेड असल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते ज्यामुळे फंगल इन्फेक्शन टाळता येईल.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)