काहीवेळा जेवणात तिखट जास्त पडतं. अशावेळी पदार्थाची चव बिघडते, तेव्हा काही भन्नाट ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे जेवणातील तिखटपणा कमी करता येईल.
जर डाळ किंवा अन्य पदार्थांमध्ये तिखट जास्त पडलं तर त्यात डेअरी प्रॉडक्टचा वापर करू तिखटपणा कमी करू शकता.
रस्सा भाजीत तिखट जास्त पडलं असेल तर दही घालून तर तिखटपणा कमी करु शकता. रस्सा भाजीमध्ये दही घालू शकता. तसेच जर सुक्या भाजीत तिखट जास्त पडलं तर त्यात देशी तूप टाकून तिखटपणा कमी करू शकता
रस्सा भाजीमध्ये तिखटपणाला कमी करण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा उपयोग करू शकता.
पदार्थात तिखट जास्त पडलं असेल तर त्यात साखर किंवा गूळ घालून तिखटपणा कमी करू शकता.
पदार्थामध्ये तिखट जास्त पडलं असेल तर लिंबाचा रस पिळून तुम्ही तो कमी करू शकता.
रस्सा भाजीत तिखट जास्त पडलं तर त्यात बटाटे टाकून तिखटपणा समांतर करू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)