कारल्याच्या भाजीचा कडवटपणा असल्याने मुलं भाजी खायला टाळाटाळ करतात. पण कारलं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
काही मिनिटांत कारल्यातील कडवटपणा दूर करण्यासाठी या टिप्स जाणून घ्या.
कारल्यातील कडूपणा दूर करण्यासाठी सगळ्यात आधी त्याची सालं नीट काढून घ्या. तसंच, बियादेखील काढून घ्या.
कारलं कापून झाल्यानंतर त्याला मीठ लावून काही वेळासाठी तसंच ठेवून द्या
कारल्याच्या भाजीत दही टाकूनदेखील तुम्ही करु शकता.
कारल्याच्या भाजीत आमचूर पावडर टाकल्यासही कडवटपणा दूर होतो.
कारलं कापून तुम्ही नारळाच्या पाण्यातदेखील ठेवून शकता. त्यामुळं कडवटपणा देखील जातो.