होळी हा सण हा भारतात खूप उत्साहाने खेळला जातो. मात्र, हा सण आपल्या त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतो.
होळीच्या रंगामुळे चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
होळी खेळल्यानंतर या स्किनकेअर टिप्स वापरून आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो.
होळी खेळल्यानंतर, सौम्य फेसवॉश वापरून चेहरा धुवा. सौम्य फेसवॉश तुमची त्वचा कोरडी करणार नाही.
नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने चेहऱ्यावर मालिश केल्याने होळीचा रंग लवकर निघून जातात.
चेहरा धुतल्यानंतर आणि तेल लावल्यानंतर, चेहऱ्यावर गुलाब पाणी स्प्रे करावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहील.
दही, हळद आणि मध मिसळून एक पॅक तयार करा आणि तो 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे होळीचे रंग सहज निघून जातील.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)