लोणच्यांचे अनेक प्रकार असले तरी आंब्याचे लोणचे लहान ते मोठे सगळ्यांचं आवडते.
बऱ्याचदा लोकांच्या घरी स्टोअर केलेल्या आंब्याच्या लोणच्यामध्ये एक विचित्र बुरशी वाढते, ज्यामुळे लोणचे खराब होते.
आंब्याच्या लोणच्यातील बुरशी काढून टाकण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.
लक्षात घ्या लोणचे बनवण्यापूर्वी कैरी चांगली वाळवा आणि त्यातील सर्व ओलावा काढून टाका.
तुम्ही लोणचे फक्त उन्ह येईल अशा ठिकाणी आणि कोरड्या जागीच ठेवावे. अंधारात ठेवण्याचे टाळा.
ओल्या हातांनी किंवा चमच्याने कधीही लोणचे काढू नये.
तुम्ही लोणचे काचेच्या किंवा मातीच्या भांड्यातही ठेवा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)