कपड्यांवरील हळदीचे किंवा तेलाचे डाग कसे घालवावे?

Intern
Mar 25,2025


कपड्यांवर हळदीचे किंवा तेलाचे डाग लागणे ही एक सामान्य समस्या आहे.


मात्र, त्यांना स्वच्छ करणे कधी कधी कठीण होऊ शकते.


या घरगुती पद्धतीने हे डाग सहजपणे काढता येऊ शकतात.

साहित्य:

1 चमचा बेकिंग सोडा, लिक्विड डिटर्जंट, लिंबाचा रस, व्हिनेगर, 1 कप पाणी


एका स्प्रे बॉटलमध्ये सर्व साहित्य एकत्र करून चांगले ढवळून घ्या.


ज्या ठिकाणी डाग पडले आहेत त्यावर हे मिश्रण शिंपडा.


नंतर टूथब्रशच्या मदतीने त्या डागांवर हलक्या हाताने घासा.


हे मिश्रण 2 ते 3 वेळा कपड्यांवर लावल्यास डाग पूर्णपणे निघून जातात.


या सोप्या पद्धतीने तुम्ही कपड्यांवरील हळदीचे आणि तेलाचे डाग सहजपणे काढू शकता.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story