भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये आलं आणि लसूण सर्रास वापरला जातो.
काही पदार्थांची चव वाढवण्यासाठी, तर काही पदार्थांचा उग्रपणा कमी करण्यासाठी आलं- लसूणची पेस्टसुद्धा वापरली जाते.
अनेकदा आलं लसूण पेस्ट अधिक प्रमाणात बनवून ती साठवून ठेवली जाते आणि गरजेनुसार तिचा वापर केला जातो.
ही आलं लसूण पेस्ट 5 महिने टीकण्यासाठीसुद्धा एक कमाल युक्ती आहे.
दीर्घकाळासाठी आलं लसूण पेस्ट स्टोअर करु इच्छिता तर, 60 लसूण आणि 40 आल्याचे तुकडे, त्यात अर्धा चमचा मीठ, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा राईचं तेल मिसळून गरजेनुसार बारीक वाटून घ्या.
पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात वरून व्हिनेगर मिसळल्यानंसुद्धा ती दीर्घकाळ टीकते. आलं लसूण पेस्ट अधिक काळासाठी टीकवायची असल्यास ती तेलावर बराच वेळ परतून पूर्णपणे थंड करून हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवल्यासही फायदा होतो.