उन्हाळ्यात प्रत्येकालाच शरीराला गारवा म्हणून आईस्क्रिम खायला आवडते. अशावेळी अनेक लोकं बाहेर जाऊन आईस्क्रिम खातात. पण मुलांसाठी घरी स्टोर करायचे असेल तर
लोकांना असं वाटतं की, नॉर्मल फ्रिजमध्ये आईस्क्रिम स्टोर करणे शक्य नाही. याकरिता हेवी कुलिंग रेफ्रिजरेटर पाहिजे. मात्र असं नाही.
नॉर्मल फ्रिजमध्ये आइस्क्रिम स्टोर करताना फ्रीजरमध्ये अगदी मागे ठेवा. जर हे पुढे ठेवले तर सतत फ्रिज उघडल्यावर तापमान बिघडते आणि आइस्क्रिम वितळते.
फ्रिजरमध्ये मागे डब्बा ठेवलावर त्याला ढाकण असेल याची काळजी घ्या. नाहीतर त्याचा स्वाद आणि टेक्सचर दोन्ही बिघडते. टाइट ढाकण आणि रॅप करुन ठेवा.
आईस्क्रिम स्टोर करताना कायम लक्षात ठेवा की, मसालेदार पदार्थांच्या शेजारी ठेवू नका. डेअरी प्रोडक्टमध्ये लवकर गंध शोषून घेण्याची ताकद असते. ज्यामुळे आईस्क्रिमचा स्वाद बिघडतो. त्यामुळेच वेगळं ठेवा.
फ्रॉस्ट फ्री फ्रीजर फ्रॉस्ट बनण्यापासून रोखण्यासाठी थंड आणि विरघळण्यापासून रोखते. जर खूप दिवस आईस्क्रिम ठेवायचं असेल तर डीप फ्रीजरमध्ये ठेवा.
आईस्क्रिम विरघळल्यावर तो पुन्हा फ्रिजरमध्ये घट्ट होण्यासाठी ठेवू नका. कारण याची चव वेगली लागते. ते पुन्हा घट्ट करण्यापेक्षा त्याच वेळी खाणे योग्य.