उन्हाळ्यात तापमान जास्त असताना तुळशीचे रोप सतत सुकून जाते. अशातच तुळशीची काळजी कशी घ्यावी याची माहिती जाणून घ्या.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही टिप्स ज्याच्या मदतीने तुमच्या घरातील तुळशीचे रोप पुन्हा बहरेल
उन्हाळ्यात तुळस कडक उन्हात ठेवू नका. तसंच, नारळाच्या शेंड्या तुळशीच्या कुंडीत सर्वात खाली ठेवा नंतर त्यावर माती टाका. जेणेकरुन थोडी दमटपणा टिकून राहिल.
तुळशीच्या झाडाला सकाळ व संध्याकाळी दोन्ही वेळा पाणी टाका. त्याचबरोबर पानांवरही पाणी शिंपडा
तुळशीचे रोप कधीही मातीच्या कुंडीतच लावावे. प्लास्टिकच्या कुंडीत रोप सुकून जाते
कडक उन्हात तुळस सुकू नये म्हणून तिच्यावर सुती कपडा टाकून ती झाकून ठेवा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)