अशी घ्या तुमच्या घरातील रोपांची काळजी...!

बहुतेक लोकांना टेरेस किंवा बाल्कनीत सुंदर गार्डन असावं त्यात सुंदर झाडं असावी असं अनेकदा वाटतं. आपल्यापैकी बरेचजण फावल्या वेळामध्ये झाडं लावण्याचा छंद जोपासतात. मात्र लावलेल्या झाडाची योग्य काळजी न घेतल्यास कालांतराने ते झाड मरते. आपल्या दररोजच्या जबाबदाऱ्या पार पाडतानाही आपण झाडांची काळजी घेऊ शकतो.

सर्वप्रथम झाडं लावायला जागा किती आहे, हे पाहूनच कोणती झाडं लावावीत हे ठरवावं नाहीतर कमी जागेत खूप झाडं लावल्यास झाडांचं नियमीतप पोषण मिळणार नाही.

तुम्ही तुमच्या बाल्कनीत भाज्या, फुलझाडे आणि औषधी वनस्पती लावू शकता. यात तुम्ही पालक, टोमॅटो, मिरची, तुळस अशी झाडे लावून छोटसं गार्डन तयार करू शकता.

छोट्याशा बाल्कनी गार्डनमध्ये तुम्ही हँगिंग प्लांटर्स, रेलिंग प्लांटर्स आणि विंडो बॉक्स अश्या पद्धतीने झाडं लावून बागेची जागा वाढवू शकता.

गार्डनमध्ये तुम्ही बिया लावलेल्या कुंड्यांना नावं द्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कोणत्या कुंडीतं कोणती रोपं आहेत. कोणत्या रोपासाठी किती पाणी घालावं हे देखील लक्षात येईल.

सुट्टीच्या दिवसांत आपण घरात नसल्याने पाण्याअभावी रोपं मरण्याची भीती असते. अशावेळी पाणीसाठवणीच्या भांड्यातून छोट्या नळीद्वारे कुंडीमध्ये झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करता येईल. थेंबाचे प्रमाण खूप मंद ठेवावे. ज्यामुळे रोपांच्या कुंडीतला मातीचा ओलावा कायम राहील.

झाडांच्या वाळलेल्या फांद्या, पानं आणि फुलं वेळोवेळी काढून झाडे सुदृढ ठेवावीत.

प्रत्येक रोपासाठी योग्य खत वापरा कारण त्याला बरे होण्यासाठी आणि पूर्ण आरोग्यासाठी विशिष्ट पोषक तत्वांची आवश्यकता असेल.

VIEW ALL

Read Next Story