हिवाळ्यात कोरड्या त्वचेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
कोरड्या त्वचेला दूर करण्यासाठी आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कोरफडीचे जेल वापरू शकता.
कोरफड आणि बदामाच्या तेलाचे मिश्रण लावल्याने काळे डाग कमी होतात. थोड्याशा एलोवेरा जेलमध्ये बदामाचे तेल मिसळा आणि झोपण्यापूर्वी लावा. याचा खूप फायदा होईल.
नारळाच्या तेलात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई सोबत अनेक खनिजे असतात. हे लावल्याने त्वचा कोरडी होणार नाही.
कोरफडीच्या जेलमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता. हे लावल्याने त्वचा चमकदार तर होतेच पण इन्फेक्शनपासूनही सुटका मिळते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)