आजच्या धावपळीच्या काळात दिवसभरातील कामांच्या तणावामुळे लोकांच्या झोपेचे चक्र बिघडत चालले आहे.
दररोज रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा जाग येणे, हे याचं मुख्य कारण. अशा झोपेच्या चक्रामुळे सकाळी कामावर जायला देखील उशीर होतो.
कधीतरी अलार्म वेळेवर वाजला नाही की आपली सगळी कामं वेळेत होत नाहीत. अशा वेळी, काही कामं तर करायची राहूनच जातात.
आज आम्ही तुम्हाला काही अशा टीप्स सांगणार आहोत, ज्याच्या वापराने तुम्ही अलार्म न लावता वेळेवर उठू शकाल.
अलार्म न लावता आपल्याला हव्या त्या वेळेत म्हणजेच सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येत बदल करायला हवा.
रात्री लवकर झोपल्याने सकाळी आपोआपच लवकर जाग येते.
याव्यतिरिक्त, रात्री झोपण्याची एक निश्चित वेळ ठरवा जेणेकरुन ती वेळ तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनेल.
रात्री झोपण्याच्या आधी हलका आहार घेतल्याने तुम्हाला जास्त झोप लागणार नाही आणि तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल.
यासोबतच रात्री झोपण्याच्या आधी हळदीचे दूध प्यायल्याने लवकर झोप येते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)